मुख्य विषयाकडे जा| स्क्रीन वाचक प्रवेश
Weather Alert
Google Lens
Subscribe

बंदर_backup

मासळी उतरविण्याच्या केंद्र व मत्स्यबंदरांचा विकास कामांची टिप्पणी महाराष्ट्र राज्याला 720 किमी लांबीचा सागरी किनारा लाभला असून सात सागरी जिल्हयात 3 मत्स्यबंदरे व 170 मासळी उतरविण्याची केंद्रांचा समावेश आहे. त्या 173 मासळी उतरविण्याच्या केंद्रापैकी 41 मासळी उतरविण्याच्या केंद्रावर मच्छिमारांना पायाभूत मुलभूत सुविधा केंद्र/राज्यशासना मार्फत पुरविण्यात आली आहेत. उर्वरित 7 नविन मत्स्यबंदरे, २ मत्स्यबंदरांचे आधुनिकीकरण, तसेच 29 मासळी उतरविण्याची कामे हाती घेणेत आली आहेत आणि नाबार्ड टप्पा २९ अंतर्गत 5 कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. केंद्र/राज्य शासनामार्फत मच्छिमारांना बंदरे, जेट्टी व इतर मुलभूत सूविधा पुरविण्यासाठी खालील योजनेंतर्गत कामे हाती घेण्यात आली आहेत.
  1. केंद्र पुरस्कृत योजना-
केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गंत आनंदवाडी, जि. सिंधुदुर्ग येथे मत्स्यबंदर बांधणे व ससून गोदी मत्स्यबंदराचे अत्याधुनिकरण करणे ही कामे महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ, मुंबई यांचे मार्फत प्रगतिपथावर तसेच कंरजा जि. रायगड येथे मत्स्यबंदर बांधणे व मिरकरवाडा टप्पा-2 हे काम महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मुंबई यांचेमार्फत कामे महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळास हस्तांतरीत करण्यात आली आहेत.
  1. नाबार्ड ग्रामीण पायाभूत विकास निधी योजना (RIDF)
नाबार्ड मार्फत ग्रामीण पायाभूत विकास निधी(RIDF) योजनेंत मासे उतरविण्याच्या केंद्रावर मच्छिमारांना मुलभूत सुविधा पुरविणे करीता राज्य शासनास कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. यामध्ये नाबार्ड कर्ज हिस्सा प्रकल्प किंमतीच्या ९५%  असता तरी उर्वरीत ५% हिस्सा राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येतो.
अ. नाबार्ड (RIDF)टप्पा-22 सदरच्या योजनेअंतर्गत रु. 63.16 कोटी इतक्या रक्कमेच्या एकुण 7 कामांना प्रशासकीय मान्यता शासन पत्र मत्स्यवि-2017/ प्र.क्र.45/ पदूम, दि. 23/02/2017 रोजी मिळालेली आहे. सदरचे कामांची कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय, मुंबई काम करते. सद्यस्थितीत मंजूर ७ कामांपैकी पाचुबंदर, ता. वसई, जि. पालघर दिवाळे गाव, ता. बेलापूर,जि. ठाणे, बोर्ली मांडला, ता. मुरुड, जि. रायगड व बोऱ्या, ता. गुहागर, जि.रत्नागिरी ही 4 कामे पूर्ण झाली आहेत, विजयदुर्ग, ता. देवगड, जि. सिंधुदूर्ग हे काम प्रगतीपथावर आहे आणि चिंबई ता. अंधेरी जि. मुबई उपनगर येथील जेट्टी व रॅम्प(उतरता धक्का) चे काम पूर्ण झाल्यावर अंशत: रद्द करण्यात आले तर मेढा ता. मालवण जि.सिंधुदुर्ग हे काम पर्यावरण पूरक परवानग्या प्राप्त  झाल्याने पूर्णत: रद्द करण्यात आले आहे.
ब.नाबार्ड (RIDF) टप्पा-23 सदरच्या योजनेंतर्गत रू. 51.37 कोटी इतक्या रक्कमेचे एकूण ५ कामांना प्रशासकिया मान्यता शासन निर्णय क्र. मत्स्यवि-1117/प्र.क.37/पदुम-14 दि.6/3/2018 रोजी प्राप्त झाली आहे. सदरचे कामांची कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय, मुंबई काम करते. सद्यस्थितीत मंजूर कामांपैकी राजपुरी ता.मुरूड जि.रायगड हे काम पूर्ण झाले असून  धाकटी डहाणू, ता. डहाणू, जि. पालघर, दिघी ता.श्रीवर्धन जि.रायगड, वेलदुर ता.गूहागर जि.रत्नागिरी ही ३ कामे प्रगतीपथावर आहेत. तर जुहु मोरगाव ता. अंधेरी जि. मुंबई उपनगर हे काम मिलिटरी वायरलेस सर्वेलंस प्रोटेक्टेड झोन क्षेत्रात येत असल्याने रद्द करण्यात आले आहे.
क.नाबार्ड (RIDF) टप्पा-24 सदरच्या योजनेंतर्गत रू. 79.21 कोटी इतक्या रक्कमेचे एकूण 2 कामांना प्रशासकिय मान्यता शासन निर्णय क्र. मत्स्यवि-1117/प्र.क.86/पदुम-14 दि.27/12/2018 रोजी प्राप्त झाली आहे. सदरचे कामांची कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय, मुंबई काम करते. सद्यस्थितीत मंजूर कामांपैकी नांदगांव ता.मुरूड जि.रायगड हे काम पूर्ण झाले असून नवाबाग ता.वेंगुर्ला जि. सिंधुदूर्ग ही  कामे प्रगतीपथावर आहेत.  
  1. राष्ट्रीय कृषि विकास योजना सन 2016-17
सदरच्या योजनेंतर्गत रू. 107.00 कोटी इतक्या रक्कमेचे एकूण 6 कामांना प्रशासकिय मान्यता शासन निर्णय क्र. मत्स्यवि-1117/प्र.क.61/पदुम-14 दि.23/2/2017 रोजी प्राप्त झाली आहे. सदरचे कामांची कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय, मुंबई काम करते. या कामांकरीता १००% निधी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतर्गत उपलब्ध करून देण्यात येतो.  मंजूर कामांपैकी मढ तळपशा, ता. अंधेरी, जि. मुंबई उपनगर व मुर्बे ता.जि.पालघर ही दोन कामे पूर्ण झाली असून उत्तन पातान व उत्त्न भातोडी, ता. जि. ठाणे ही दोन कामे प्रगतीपथावर आहेत. वरेडी, ता. पेण, जि. रायगड व बुरोंडी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी ही कामे रद्द करण्यात आली आहेत.  
  1. निलक्रांती योजना-
सदरच्यायोजनेंतर्गत रू. 8.00 कोटी इतक्या रक्कमेचे बोडणी ता. अलिबाग, जि. रायगड या कामास प्रशासकिय मान्यता शासन निर्णय क्र. मत्स्यवि-2016/प्र.क.159/पदुम-13 दि.06/3/2017 रोजी प्राप्त झाली असून या कामाची कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय, मुंबई काम करते. सद्यस्थितीत हे काम ८०% पूर्ण झाले असून उर्वरीत प्रगतीपथावर आहे.  
  1. मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील पायाभूत विकास निधी योजना (FIDF)
केंद्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील पायाभूत विकास(Fisheries and Aquaculture Infrastructure Fund-FIDF) या योजनेंतर्गत रू.961.22 कोटी इतक्या रक्कमेच्या 5 कामांना प्रशासकिय मान्यता शासन निर्णय क्र. मत्स्यवि-1120/ प्र.क्र.25/ पदुम-14 दि.6/6/2023अन्वये मान्यता प्राप्त झाली आहे. या योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून पाच कामांची मिळून रू.७१६.५४ कोटीचे कर्ज राज्य शासनास उपलब्ध करून देण्यात येणार असून उर्वरीत निधी राज्य शासनाकडून उपलब्घ करून देण्यात येणार आहे. सदरची कामे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मुंबई यांचे मार्फत राबविण्यात येत आहेत. जीवना ता. श्रीवर्धन जि. रायगड हे काम प्रगतीपथावर असून उर्वरीत हर्णे, ता.दापोली व साखरीनाटे ता. राजापूर, जि. रत्नागिरी, भरडखोल ता.श्रीवर्धन,जि. रायगड  आणि सातपाटी ता.पालघर, जि. पालघर ह्या कामांची पर्यावरणपूरक मान्यता प्राप्त करण्याची कार्यवाही चालु आहे.  
  1. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना-
या योजनेंतर्गत रू. 113.99 कोटी इतक्या रक्कमेचे एकूण 9 कामांना प्रशासकिय मान्यता केंद्र शासन नि. क्र.j-01012/27/2022-fy दि.31/3/2022 रोजी मिळालेली आहे. या कामांना राज्य व केंद्र शासनामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मंजूर कामांपैकी १.दांडी मकरेबाग ता.मालवण जि. सिंधूदूर्ग, २.तारामुंबरी ता.देवगड जि. सिंधूदूर्ग, ३.कोर्लई ता.मुरुड, जि. रायगड, ४.दाभोळ ता. दापोली जि. रत्नागिरी, ५.पालशेत ता.गुहागर जि. रत्नागिरी, ६.असगोली ता.गुहागर जि. रत्नागिरी व ७.बुधल, ता. गुहागर, जि. रत्नागिरी ही ७ कामे महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ, मुंबई तसेच शिरोडा ता.वेंगुर्ला, जि. सिंधूदूर्ग व रेवदांडा, ता. अलिबाग, जि. रायगड ही २ कामे महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड, मुंबई यांचे स्तरावरून कार्यान्वीत करण्यात येत आहेत. या कामांची पर्यावरणपूरक परवानग्या प्राप्त झाल्या असून तांत्रिक मान्यता घेण्याची कार्यवाही चालू आहे.
Scroll to Top