अ) सागरी मत्स्यव्यवसाय ६ महिन्याचा प्रशिक्षण कार्यक्रम :- नौकांचे यांत्रिकीकरणाद्वारे प्रगत मच्छिमारी तंत्राचा अवलंब करून सागरी मत्स्योत्पादन कसे वाढवावे याचे मच्छिमार युवकांना सर्वांगिण प्रशिक्षण देण्याचे उद्देशाने महाराष्ट शासनाने सातपाटी व वसई (ठाणे), वर्सोवा (मुंबई), आलिबाग (रायगड), रत्नागिरी (रत्नागिरी) व मालवण (सिंधुदूर्ग) येथे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली आहेत. या केंन्द्रात सागरी मत्सव्यवसाय नौकानयन, सागरीमासेमारीपध्दती, नौका इंजिनाची देखभाल व परिरक्षण इ. बाबतचे प्रशिक्षण देण्यात येते.
- प्रशिक्षण कालावधी – ६ महिने.
- प्रशिक्षण सत्रे – २ सत्रे (१ जानेवारी ते ३० जुन व १ जुलै ते ३१ डिसेंबर).
- प्रशिक्षणार्थी क्षमता – २२ प्रशिक्षणार्थी प्रति सत्र प्रशिक्षणार्थी
- प्रशिक्षणार्थी शुल्क – दारिद्रय रेषेखालील प्रशिक्षणार्थीस दरमहा रू. १००/-
दारिद्रय रेषेवरील प्रशिक्षणार्थीस दरमहा रू. ४५०/-
पात्रता –
- प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छिमार असावा.
- प्रशिक्षणार्थीस मासेमारीचा किमान वर्षाचा अनुभव असावा.
- प्रशिक्षणार्थी १८ ते ३५ वयोगटातील असावा.
- प्रशिक्षणार्थीने शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे आवश्यक.
- प्रशिक्षणार्थी किमान ४ थी पास असावा व लिहिता वाचता येणे आवश्यक.
- प्रशिक्षणार्थीस पोहता येणे आवश्यक.
- प्रशिक्षणार्थीस मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस आवश्यक.
ब) प्रशिक्षण शुल्क आकारून घेण्यात येणारे प्रशिक्षणक्रम. (लघु प्रशिक्षण कार्यक्रम) :- कृषि व पदुम विभागाचा शासन निर्णय क्र. मत्स्यआ/२००२/प्र.क्र.१०/पदुम-१२, दि. ३०.३.२००२ नुसार ९ विविध मत्स्यव्यवसाय लघुप्रशिक्षण विभागामार्फत राबविण्यात येतात. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे. ठिकाण, प्रशिक्षण शुल्क प्रशिक्षण कालावधी या बाबतची माहिती खालील प्रमाणे आहे.
प्रशिक्षण |
कालावधी दिवस |
शुल्क रू. |
प्रशिक्षार्थी क्षमता |
सत्रे |
ठिकाण |
मरिन डिझेल इंजिन व त्याची देखभाल |
३० |
७५०/- |
२५ |
२ |
सागरी प्रशिक्षण केंन्द्र |
नौकानयन शास्त्र |
३० |
१,०००/- |
२५ |
२ |
सागरी प्रशिक्षण केंन्द्र |
सार्वजनिक मत्स्यालय व्यवस्थापन |
१५ |
२,०००/- |
२० |
२ |
तारापोरवाला मत्स्यालय,मुंबई |
मासेमारी नौकांवर संदेशवहन मत्स्यशोधन उपकरणांचा उपयोग |
५ |
५००/- |
२५ |
५ |
मच्छिमार सहसंस्था |
गोडया पाण्यातील मिश्र मत्स्यशेती |
१० |
१,०००/- |
२० |
२ |
शासकीय म.बी.केंन्द्र |
गोडया पाण्यातील कोळंबी संवर्धन |
१० |
१,०००/- |
२० |
२ |
शासकीय म.बी.केंन्द्र |
प्रमुख कार्प मत्स्यबीज उत्पादन |
१५ |
१,०००/- |
२० |
२ |
शासकीय म.बी.केंन्द्र |
जिताडा व तिलापिया |
१० |
१,०००/- |
२० |
२ |
शासकीय म.बी.केंन्द्र |
शोभिवंत मत्स्यालयाचे व्यवस्थापन |
५ |
२५०/- |
१५ |
५ |
तारापोरवाला मत्स्यालय,मुंबई |